पदवीधर हा समाजातील अतिशय महत्वाचा घटक आहे. देशाच्या, राज्याच्या एकूणच समाजाच्या जडणघडणीमध्ये पदवीधरांचा मोलाचा वाटा असतो. अनेकदा पदवीधरांना किंवा पदवीचे शिक्षण घेणार्याa विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात काम करताना, शिक्षण घेताना किंवा समाजात वावरताना विविध समस्या किंवा प्रश्नांना सामोरे जावे लागते. अशा समाजातील मुख्य मानल्या जाणाऱ्या घटकाला, पदवीधरांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्याच्या हेतूने “राष्ट्रवादी पदवीधर संघटना, शरदचंद्र पवार” मार्फत/अंतर्गत “NationalistGraduateForum (NGF)”ची सुरुवात कण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यातील बहुसंख्य पदवीधरांना आवाहन करण्यात येत आहे की आपण “NationalistGraduateForum (NGF)” मध्ये सहभाग घ्यावा