केलेली-कामे

  • अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या विविध मागण्यांची पूर्तता करणे बाबत

    अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस गेल्या काही दिवसा दिवसांपासून त्यांच्या विविध मागण्या संदर्भात आंदोलन करत होत्या. सरकारची प्रत्येक योजना घराघरात पोहोचवणाऱ्या अगदी गाव स्वच्छते पासून ते गरोदर मातांचे लसीकरण बालकांचे पोषण विविध अभियान राबवण्यात महत्त्वाची भूमिका बाजवणाऱ्या कोरोना सारख्या भयंकर महामारीच्या काळात घरोघरी जाऊन लोकांची काळजी घेणाऱ्या सेविका आणि मदतीने यांच्या मागण्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज होती सर्वोच्च न्यायालयाने अंगणवाडी सेविका यांना ग्रॅज्युएटी मिळण्यास पात्र असल्याचा निर्णय देऊ नये त्यांना ग्रॅज्युएटी पासून वंचित राहावे लागत होते अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना अद्यापही शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळालेला नसून त्यांची निवृत्ती वेतनाची मागणी ही अजून पूर्ण झाली नसल्याचे निदर्शनास आले होते महिला सबलीकरण करण्याच्या हेतूने सरकारने तातडीने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या प्रामुख्याने निवृत्ती वेतनाची तसेच इतर मागण्यांची दाखल देऊन त्यांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा यासाठी महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन यांना लेखी आणि ईमेल द्वारे निवेदन देण्यात आले जेव्हा जेव्हा विषय शिक्षणाचा किंवा पदवीधरांच्या प्रश्नाचा येईल तेव्हा तेव्हा पदवीधर संघटना संघर्ष करत राहील.

    1Responsive image

  • ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी साखर शाळा सुरू करणेबाबत.....11

    राज्यभरात ऊस तोडणीचा हंगाम सुरू झालेला असून अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात ऊस तोडणी मंजूर आपल्या मुलाबाळा सह ऊस तोडणी साठी साखर कारखान्याच्या परिसरात दाखल होत असतात जेव्हा राज्यातील अनेक जिल्ह्यातून ऊस तोडणी साठी मंजूर स्थलांतर करत असतात तेव्हा जिल्हा परिषद आणि साखर कारखाने यांच्या माध्यमातून त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी साखर शाळा सुरू केल्या जातात मात्र त्यांच्या मुलांसाठी असलेल्या साखर शाळा अजून सुरू झाल्या नसल्याने परिणामी ऊसतोड कामगारांच्या मुलाचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे वास्तव समोर आले आहे तरीही ज्या साखर कारखानाच्या परिसरात ऊसतोड मंजूर वास्तव्य करतात त्या ठिकाणी साखर शाळेच्या माध्यमातून त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करण्यात यावी ही विनंती शालेय शिक्षण विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांना या संदर्भात लेखी आणि ईमेल द्वारे निवेदन देण्यात आली जेव्हा जेव्हा शिक्षणाचा आणि पदवीधरांच्या शिक्षणाचा प्रश्न उभा राहील तेव्हा तेव्हा पदवीधर संघटना संघर्ष करत राहील.

    Responsive image

  • पवित्र पोर्टल द्वारे प्रकाशित प्रसिद्ध केलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये मराठी माध्यमातील शिक्षकांना प्राधान्य न मिळणे बाबत.....

    पवित्र पोर्टल द्वारे नुकत्याच प्रकाशित झालेल्या प्रसिद्ध केलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेला अनुसरून असे निदर्शनास आले आहे की इंग्रजी माध्यमातील अभियोग्यता धारकांना पूर्ण मराठी माध्यम इंग्रजी माध्यम आणि सेमी इंग्रजी माध्यम अशा तिन्ही ठिकाणी अर्ज करता येणार आहे मराठी माध्यमांच्या उमेदवारांना केवळ एकाच ठिकाणी अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे तसेच शिक्षक निवडीसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली असून या परीक्षेमध्ये उमेदवारांनी त्यांची गुणवत्ता सिद्ध केले आहे त्यामुळे मराठी माध्यमाच्या सेमी इंग्रजी शाळांमध्ये शिक्षक पदावर आणि केंद्र शाळांवर नेमणूक करताना कोणत्याही माध्यमांचा इंग्रजी माध्यम विचार न करता गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड करणे गरजेचे आहे सेमी हे वेगळे माध्यम नसून मराठी माध्यमातून आहे त्यामुळे इंग्रजी माध्यमाला प्राधान्य देणे म्हणजे गुणवत्ताधारक मराठी शिक्षकांवर अन्याय करणे आहे तरीही मराठी माध्यमातील उमेदवारांना शिक्षकांना शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये प्राधान्य मिळावे यासाठी कोणत्याही माध्यमांचा विचार न करता गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड करण्यात यावी या संदर्भाचे निवेदन पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराध्यक्ष मा. प्रशांत दादा जगताप तसेच पदवीधर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्रजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी पदवीधर संघटना पुणे जिल्हा शहर च्या वतीने शिक्षण आयुक्तालय पुणे येथे Inward करण्यात आले आणि त्यासंबंधीची पोहोचही घेण्यात आली आपला प्रवीण आल्हाट शहर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी पदवीधर संघटना पुणे शहर.

    Responsive image

  • तलाठी परीक्षा आणि भरती प्रक्रियेमध्ये झालेल्या गैरप्रकाराबद्दल

    बहुप्रतीक्षित तलाठी भरती परीक्षेची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे परंतु त्यात अनेक उमेदवारांना एकूण २०० गुणांपैकी अधिक गुण मिळाल्याचे निदर्शनास आल्याने ही परीक्षा प्रक्रिया पुन्हा वादात अडकली आहे परीक्षा केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला आहे जालना येथील एका उमेदवाराला तलाठी भरतीच्या पंधरा दिवस आधी झालेल्या एका विभागाच्या परीक्षेत ६६ गुण मिळाले होते त्याला आता तलाठी भरतीच्या गुणवत्ता यादीमध्ये सामान्यी करण नॉर्मलायझेशन नंतर २०१ गुण मिळाले तर चंद्रपूर येथील एका विद्यार्थिनीला वनविभागाच्या परीक्षेत ५४ गुण असताना तिला तलाठी भरती मध्ये २१४ गुण मिळाले नागपूर येथील एका उमेदवाराला वनरक्षक भरती त ६० गुण असताना तलाठी भरती मध्ये २०८ गुण मिळाले आहेत या उमेदवारांचा निकाल बघता गुणवत्ता यादीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे तलाठी भरती परीक्षा प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र घेण्यात आली असून ३६ जिल्हा केंद्रांपैकी केवळ पाच जिल्ह्यांमध्ये उमेदवारांची संख्या ही ५० हजारांवर होती त्यामुळे अन्य ३१ जिल्हा केंद्रांवर एकाच सत्रात परीक्षा घेणे शक्य झाले असते व नॉर्मलायझेशन सामान्यीकरण चा नियम न वापरता सरसकट निकाल जाहीर करता आला असता परंतु तसे न झाल्याने गुणवत्ता यादी संदर्भात गोंधळ उडाला आहे महसूल विभागाने दिलेल्या माहितीनुसार नॉर्मलायझेशन सामान्यीकरण गुण हे एकूण गुणांपेक्षा जास्त होऊ शकतात मात्र परीक्षेतील या प्रक्रिये बाबत अन भीज्ञता असल्याने एकूणच या तलाठी भरती प्रक्रिया संदर्भात गैरसमज निर्माण झाला आहे तरीही तलाठी भरती परीक्षा आणि प्रक्रियेमध्ये अधिकाधिक पारदर्शकता आणावी यासाठी शासनाने प्रयत्न करावे यासाठी राष्ट्रवादी पदवीधर संघटनेने पदवीधर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्रजी काळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर अध्यक्ष प्रशांत दादा जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी पुणे तसेच विभागीय आयुक्त महसूल विभाग यांना निवेदन दिले राष्टा पाठपुरावा करत राहील .

    Responsive image

  • स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी पुणे महानगरपालिकेमार्फत मोफत वाचनालय आणि वस्तीगृहांची सोय करण्यात यावी

    स्पर्धा परीक्षकांची तयारी करण्यासाठी प्रामुख्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी बरेचसे विद्यार्थी हे महाराष्ट्र राज्यातील विविध भागातून तसेच देशातील इतर राज्यातून पुणे शहरात दाखल होतात बहुतांशी विद्यार्थी हे ग्रामीण भागातून पुणे शहरात स्थलांतरित होतात आर्थिक दृष्ट्या गरीब किंवा मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करताना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते अभ्यास करण्यासाठी लागणारी महागडी पुस्तके घेणे विद्यार्थ्यांना बहुतेक वेळ शक्य होत नाही त्यामुळे त्यांना शहरात उपलब्ध असणाऱ्या लायब्ररीचा सहारा घ्यावा लागतो पुणे शहरात मोठ्या संख्येने विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी येत असतात त्यामानाने लायब्ररीच्या संख्या ही कमी अगदी तुरळक असल्याकारणाने त्यांना अभ्यास करण्यासाठी अडचणी येतात तरीही पुणे महानगरपालिके मार्फत पुणे शहर परिसरात या गरजू आर्थिकदृष्ट्या गरीब किंवा मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी मोफत किंवा योग्य सवलतीच्या दरात जास्तीत जास्त लायब्ररींची सोय करण्यात यावी यासंदर्भात राष्ट्रवादी पदवीधर संघटना शरदचंद्र पवार पक्षातर्फे पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. रवींद्र बिनवडे यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आले पदवीधरांच्या प्रश्नांसाठी पदवीधर संघटना नेहमी कार्यरत राहील .

    Responsive image

  • सन्मान कर्तुत्वान युवतींचा

    महिला आणि युवतींचे सबलीकरण करणे हेतू राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराच्या २९ व्या मासिक कार्यकारिणी बैठकीमध्ये राष्ट्रवादी पदवीधर संघटना पुणे शहर तसेच राष्ट्रवादी सोशल मीडिया सेल पुणे शहराच्या वतीने राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्ताने पक्षातील कर्तुत्वांना युवतींच्या त्यांनी पक्षासाठी दिलेल्या योगदानाबद्दल माजी आमदार आणि पक्षाचे प्रदेश सचिव मा. जयदेवराव गायकवाड पुणे शहर अध्यक्ष मा. प्रशांत दादा जगताप मा. अंकुश अण्णा काकडे माजी शहराध्यक्ष मा. रवी अण्णा माळवदकर अटी मान्यवरांच्या उपस्थीत सन्मान करण्यात आला चांगल्या कार्या ची दखल आणि महिला सक्षमीकरण करण्यासाठी पदवीधर संघटना शरदचंद्र पवार पुणे शहर नेहमीच तत्पर राहील.

    Responsive image

  • नॅशनॅलिस्ट ग्रॅजुएट फोरम अंतर्गत अनेक पदवीधरांना नोकरी च्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या

    राष्ट्रवादी पदवीधर संघटना शरदचंद्र पवार पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचे अध्यक्ष अबरार शेख, कार्याध्यक्ष कुलदीप देशमुख आणि उपाध्यक्ष रवींद्र ताकवणे यांच्या सहकार्याने  आणि Nationalist Graduate Forum (NGF) अंतर्गत/वतीने बऱ्याच पदवीधरांना नोकरी च्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. नामांकित IT कंपन्यांमध्ये Job placement देण्यात आले.

    Responsive image

  • निवेदन: शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत (RTE) आर्थिक व सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकातील बालकांना खासगी शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश मिळवून देणे बाबत.

    शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी शिक्षण विभागातर्फे शिक्षणाचा हक्‍क कायद्यांतर्गत आर्थिक व सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकातील बालकांना शिक्षणाची संधी उपलब्‍ध करून देताना मोफत प्रवेशाची योजना राबविण्यात येत होती परंतु शिक्षणाचा हक्‍क कायद्यांतर्गत खासगी इंग्रजी माध्यामांच्या शाळांमध्ये २५ टक्‍के जागांवर प्रवेश दिला जाणार नाही अशी भुमिका काही खासगी इंग्रजी माध्यमातील शाळांनी घेतली असून त्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. याचिकेला अनुसरून मुंबई उच्च न्यायालयात प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने २०२४-२५ या वर्षाच्या आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेबाबत न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार २५ टक्के प्रवेश लॉटरी सोडत जाहीर करण्यात येईल यासंदर्भाची सूचना शिक्षण विभागाने जाहीर केली आहे.

    दरम्‍यान शनिवार दि. १५ जून, २०२४ पासून शाळांना सुरवात झालेली असून, नियमितपणे अध्ययन प्रक्रियेला सुरवात होणार आहे. दुसरीकडे आरटीईचे प्रवेश रखडल्‍याने या योजनेतून प्रवेशोच्‍छुक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. सोडत जाहीर झाल्‍यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुदत द्यावी लागेल. रिक्‍त जागांवर प्रतीक्षा यादीनुसार प्रवेश दिले जातील. ही संपूर्ण प्रक्रिया साधारणतः महिनाभर चालण्याचा अंदाज असल्‍याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.

    तरीही, मुंबई उच्च न्यायालयाचा पुढचा आदेश येईपर्यंत, मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही यासाठी शालेय शिक्षण विभाग तसेच महाराष्ट्र शासनाद्वारे ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासंबंधीचे निवेदन महराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब यांना देण्यात आले.

    Responsive image

  • निवेदन: महाविद्यालयामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (SEBC) तसेच, इतर मागासवर्ग (OBC) या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क मोफत करणेबाबत

    महाविद्यालयामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (SEBC) तसेच, इतर मागासवर्ग (OBC) या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क माफ व्हावे यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पुणे शहर च्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. महाराष्ट्र सरकारने याची दखल घ्यावी यासाठी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनावेळी विधानभवनात जाऊन अनेक विधानसभा सदस्य/आमदार यांच्याशी चर्चा करून हि बाब लक्षात आणून दिली. त्यानंतर काही दिवसांतच महाराष्ट्र सरकारने GR प्रसिद्ध करत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (SEBC) तसेच, इतर मागासवर्ग (OBC) या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क माफ केले.

    Responsive image

  • आंदोलन स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे.

    MPSC चे असंख्य विद्यार्थी पुणे येथे त्यांच्या खालील मागण्यांसाठी आंदोलन करत होते. स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक वेळी संघर्ष करावा लागतो हि बाब अतिशय दुर्दैवी आहे.

    IBPS आणि MPSC या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी असल्याकारणाने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या दोन्ही हि परीक्षा एकाच दिवशी न घेता परीक्षा वेळापत्रकामध्ये तात्काळ बदल करावा.

    कृषिसेवेच्या २५८ जागा या राज्यसेवेतून भरल्या जाव्यात

    Combine ग्रुप ब आणि क याची जाहिरात लवकरात लवकर प्रकाशित व्हावी

    राष्ट्रवादी पदवीधर संघटना पुणे शहरच्या वतीने आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांशी चर्चा केली आणि शासनाने लवकरात लवकर संबंधित नोटिफिकेशन जाहीर करावे यासंदर्भाची मागणी केली.

    Responsive image

  • निवेदन: पोलिस उपनिरीक्षक पदांचे जास्तीत जास्त पदांचे मागणीपत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवणे बाबत

    महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या १८ सप्टेंबर २०२४ च्या प्रसिद्धिपत्रकानुसार महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी सर्व पदांचे सुधारित मागणीपत्र पाठवणे अभिप्रेत आहे. गृहविभागाने अजून पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाचे सुधारित मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवले नाही. त्यामुळे जाहिरात अडकून पडली होती त्यात विधानसभा निवडणूक २०२४ ची आचारसंहिता नजीक आलेली होती, त्यामुळे मागणीपत्र आणि वयवाढ या मागण्यांचा गांभीर्याने विचार व्हावा अशी महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थी अपेक्षा ठेवून होते.

    संबंधीचे निवेदन महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.

    Responsive image

  • पुणे शहरामध्ये एका अभ्यासिकेला आग लागण्याची घटना घडली तेंव्हा राष्ट्रवादी पदवीधर संघटना पुणे शहर च्या वतीने संबंधित विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांना योग्य ती मदत करण्यात आली

    पुणे शहरामध्ये एका अभ्यासिकेला आग लागण्याची घटना अत्यंत दुर्दैवी होती. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे खूप नुकसान झाले असून यातून सावरण्यासाठी त्यांना थोडा कालावधी गेला. परंतु परीक्षा अगदी जवळ आली असल्या कारणाने आपली नैतिक जबाबदारी म्हणून त्यांना एक मदतीचा हात देणे गरजेचे होते. वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे या विद्यार्थ्यांच्या पाठीमागे अशा वेळी उभे राहणे हे पदवीधरांचे प्रतिनिधित्व म्हणून आपले कर्तव्य आहे. आम्ही नेहमीच कठीण प्रसंगी त्यांच्या सोबत आहोत. पदवीधर संघटनेच्या वतीने त्यांची भेट घेऊन त्यांची शक्य ती मदत करण्यात आली.

    यावेळी पदवीधर संघटनेचे पुणे शहर उपाध्यक्ष श्री. मनोहर मोरे, पुणे शहर उपाध्यक्ष श्री. संकेत जमदाडे, पदवीधर संघटना पर्वती विधानसभा अध्यक्षा सौ. ऋतुजा म्हेत्रे, डॉ. ऋषिकेश जी म्हेत्रे उपस्थित होते.

    Responsive image

  • निवेदन: पुणे शहरातील कार्यरत असलेल्या सर्व अभ्यासिकांमध्ये फायर ऑडिट (Fire Audit) करणेबाबत.

    पुणे शहरात कार्यरत असलेलेल्या ‘ध्रुवतारा’ या अभ्यासिकेमध्ये भीषण आग लागण्याचा प्रकार घडला होता या घटनेमुळे अभ्यासिकेमध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. अनेक विद्यार्थ्यांची पुस्तके, लॅपटॉप ई. साहीत्यांचे नुकसान झाले. या घटनेची कारणमीमांसा केली असता असे समोर आले की या अभ्यासिकेचे फायर ऑडिट (Fire Audit) झाले नव्हते.

    तरीही अशा आग लागण्याच्या घटना इथून पुढे होऊ नयेत यासाठी आपण तत्काळ पुणे शहरातील अभ्यासिकांमध्ये पुणे महानगरपालिके मार्फत फायर ऑडिट करावे या संबंधीचे निवेदन पुणे महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आले.

    Responsive image

  • पॅरामेडीकल सायन्स या फील्ड मध्ये करिअर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली

    पॅरामेडीकल सायन्स या क्षेत्रात ज्या विद्यार्थ्यांना करिअर करायचे आहे अश्या विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी पदवीधर संघटनेच्या वतीने अल्प दरात संबंधित कोर्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

    अनेक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेतला.

    Responsive image

  • करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले

    १०, १२ चे शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी तसेच सीईटी आणि नीट ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी

    महासंसदरत्न खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदवीधर संघटनेच्या वतीने पुणे शहरात दि. २३ जून २०२४ रोजी करिअर मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते.

    Responsive image

  • सेवा वारकऱ्यांची...

    राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, पदवीधर संघटना पुणे शहर उपाध्यक्ष श्री. प्रसाद कोद्रे यांच्या पुढाकाराने संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसोहळ्यानिमित्त आलेल्या सर्व वारकरी भाविक भक्तांची पुणे शहरामध्ये औषधे, पाणी, खाद्यपदार्थ वाटप करून सेवा करण्यात आली. यावेळी उपस्थित राहून सेवा केली.

    Responsive image

  • आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

    मातंग युवा संघटना आणि सोनाई क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन पुणे शहरातील पर्वती भागात करण्यात आले होते. मातंग युवा संघटनेचे सर्वेसर्वा श्री. गुलाबराव नेटके आणि राष्ट्रवादी पदवीधर संघटनेच्या पर्वती विधानसभा अध्यक्षा डॉ. ऋतुजा म्हेत्रे, डॉ. ऋषिकेश म्हेत्रे यांच्या पुढाकाराने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन करण्याचा योग मला मिळाला.

    Responsive image

  • महाविद्यालयास ऐतिहासिक पुस्तके भेट देण्यात आली

    पुणे येथील झील कॉलेज ऑफ इंजिनअरिंग मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाने सुरू केलेल्या स्वराज्य वाचनालयास भेट दिली. थोर महापुरुषांचे पुरोगामी विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवेत यासाठी वाचनालयास काही ऐतिहासिक पुस्तके भेट दिली. 

    Responsive image

  • विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकिमध्ये मतदान कसे करावे यासंबंधीचे माहितीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले

    विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेबद्दल समाजामध्ये संभ्रम असून या प्रक्रियेबद्दल जनजागृती होणे गरजेचे आहे. या निवडणूक प्रक्रियेची सोप्या भाषेत मांडणी करून संबंधित माहितीपत्रक पदवीधर संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आले.

    Responsive image

  • स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थी आणि अधिकाऱ्यांच्या गाठी भेटी

    स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी taskforce सुरू करणेहेतू स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, या प्रक्रियेतून गेलेले विद्यार्थी, तसेच माजी आयएएस अधिकारी श्री. जोशी सर यांच्याशी चर्चा करून मार्गदर्शन घेतले. यावेळी पदवीधर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

    Responsive image

  • स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष 'Taskforce' ची सुरुवात करण्यात आली.

    स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष taskforce ची सुरुवात करण्यात आली. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी taskforce नेहमी कार्यरत राहील

    Responsive image

  • प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले

    राष्ट्रवादी पदवीधर संघटना शरदचंद्र पवार पुणे शहर च्या वतीने युवक आणि युवतींसाठी मोफत प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरांतर्गत काही मोफत कोर्सेस चे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात आली. अनेक युवक, युवती, बेरोजगार पदवीधारकांनी या प्रशिक्षण शिबिराचा लाभ घेतला.

    Responsive image

  • राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या मासिक कार्यकारिणी बैठकीमध्ये सहभाग

    राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या पुणे शहर मासिक कार्यकारिणी बैठकीमध्ये हजेरी लावून पदवीधर संघटना पुणे शहरचा वेळोवेळी आढावा दिला. तसेच पदवीधर संघटनेची वेळोवेळी बैठक घेण्यात आली.

    Responsive image