व्यासपीठ पदवीधरांचे....
पदवीधर हा समाजातील अतिशय महत्वाचा घटक आहे. देशाच्या, राज्याच्या एकूणच समाजाच्या जडणघडणीमध्ये पदवीधरांचा मोलाचा वाटा असतो. अनेकदा पदवीधरांना किंवा पदवीचे शिक्षण घेणार्याa विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात काम करताना, शिक्षण घेताना किंवा समाजात वावरताना विविध समस्या किंवा प्रश्नांना सामोरे जावे लागते. अशा समाजातील मुख्य मानल्या जाणाऱ्या घटकाला, पदवीधरांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्याच्या हेतूने “राष्ट्रवादी पदवीधर संघटना, शरदचंद्र पवार” मार्फत/अंतर्गत “NationalistGraduateForum (NGF)”ची सुरुवात कण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यातील बहुसंख्य पदवीधरांना आवाहन करण्यात येत आहे की आपण “NationalistGraduateForum (NGF)” मध्ये सहभाग घ्यावा
समाजातील विविध क्षेत्रातील पदवीधारांना संघटित करणे.
पदवीधरांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे जेणेकरून पदवीधर त्यांच्या समस्या, अडचणी, प्रश्न योग्य पद्धतीने मांडू शकतील..
पदवीधरांचे मेळावे आयोजित करणे
व्यावसायिक पदवीधारांसाठी फोरम द्वारे चर्चासत्र आयोजित करणे जेणेकरून ते व्यवसाय क्षेत्रात पदार्पण करू इच्छिणार्यांना मार्गदर्शन करू शकतील.
नोकरी करणाऱ्या पदवीधारांना त्यांच्या कार्यक्षेत्रात येणार्याज अडचणी जाणून घेणे आणि त्यासंदर्भात त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे.
पदवीचे शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी किंवा शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या क्षेत्राशी निगडीत असलेल्या नवीन तंत्रज्ञानाविषयी अवगत करणे आणि करिअरसंदर्भात मार्गदर्शन करणे.
महिला व युवतींचे सबलीकरण करणे हेतू महिला व युवतींसाठी विशिष्ठ चर्चासत्र आयोजित करणे तसेच त्यांना पदवीचे शिक्षण घेण्यास प्रवृत्त करणे.
शिक्षक पदवीधर, कृषि पदवीधर, ग्रामीण भागातील पदवीधर “Nationalist Graduate Forum (NGF)”द्वारे जोडले जातील.
इंजिनीअर, डॉक्टर, वकिल, शिक्षक तसेच इतर विविध क्षेत्रातील नामांकित आणि प्रतिष्ठीतांचे मार्गदर्शनपरी चर्चासत्र आयोजित करणे जेणेकरून नवोदितांना योग्य सहाय्य मिळेल.